esakal | डेंगू, कोरोना आणि आता क्रोबा चावला; भारतात अडकलेल्या फॉरेनरची वेदनादायी कहानी
sakal

बोलून बातमी शोधा

cobra

ब्रिटनमधून भारतात आलेल्या आणि चॅरेटीचे काम करणाऱ्या एक व्यक्तीची कहानी ऐकून तुम्हाला धक्का बसेल

डेंगू, कोरोना आणि आता क्रोबा चावला; भारतात अडकलेल्या फॉरेनरची वेदनादायी कहानी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ब्रिटनमधून भारतात आलेल्या आणि चॅरेटीचे काम करणाऱ्या एक व्यक्तीची कहानी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कोरोनामुळे राजस्थानमध्ये अडकून पडलेल्या या व्यक्तीचा एक-दोन नाही तर तीन-तीनवेळा मृत्यूशी सामना झाला आहे. या व्यक्तीचा सर्वातआधी सामना डेंगूशी झाला, त्यानंतर त्याला कोरोना विषाणूने (Coronavirus) घरले, कोरोनातून बरे झाले असतानाच व्यक्तीला विषारी अशा सापाने चावले आहे. व्यक्तीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

हॉस्पिटलमध्ये उपचार आहे सुरु

इयान जॉन्सला काही दिवसांपूर्वी जयपूर येथून 350 किलोमीटर दूर असलेल्या एका ठिकाणी विषारी कोब्राने चावले. त्यांच्यावर जोधपूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अभिषेक तातेर यांनी सांगितलं की, इयान आमच्याकडे मागील आठवड्यात आले होते. त्यांना सापाने चावले आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. पण, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. इयान यांच्यात साप चावल्याचे लक्षणं दिसून येत आहेत. त्यांना स्पष्ट दिसत नाहीये. तसेच त्यांना चालतानाही अडचण जाणवत आहे. 

औघड हाय! कोरोनाने मृत्यू झालेल्याचे केले अंत्यसंस्कार; उत्तरकार्याला परतला जिवंत

माझे वडील फायटर आहेत

GoFundMe  वेबसाईटवर वक्तव्य जारी करत इयान जॉन यांच्या मुलाने म्हटलं आहे की, माझे वडील फायटर आहेत. भारतमध्ये राहत असताना त्यांना डेंगू झाला. डेंगूतून बरे झाल्यानंतर लगेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्यांच्या अडचणी थांबल्या नाहीत. आता त्यांना  विषारी क्रोबाने चावले आहे. 

भारतात अडकलेत इयान

जॉन्सच्या मुलाने सांगितले की, त्यांचे वडील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात अडकले आहेत. ते ब्रिटेनमध्ये परत येऊ शकत नाहीत. पण मला आनंद आहे की ते भारतात राहून दुसऱ्यांची मदत करु पाहात आहेत. जॉन्स राजस्थानमध्ये पारंपरिक कामगारांसोबत काम करत होते. 

loading image
go to top