ब्रिटिश खासदार डेबी अब्राहम यांना दिल्ली विमानतळावरूनच पाठविले परत

debbie abrahams
debbie abrahams

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावरून भारत सरकारवर टीका करणाऱ्या ब्रिटनच्या खासदार यांना आज दिल्ली विमानतळावरूनच परत पाठविण्यात आले. डेबी अब्राहम असे त्यांचे नाव असून त्या मजूर पक्षाच्या खासदार आहेत. वैध व्हिसा असतानाही आपल्याला प्रवेश नाकारल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

डेबी अब्राहम या दुबईहून विमानाने निघून नवी दिल्ली विमानतळावर उतरल्या होत्या. त्यांच्याकडे ई-व्हीसा होता. मात्र, त्यांना विमानतळावरूनच पुन्हा दुबईला पाठविण्यात आले. वैध व्हिसा होता हा अब्राहम यांचा दावा भारताने फेटाळला आहे. व्हिसा रद्द केल्याचे वेळीच कळवूनही अब्राहम या भारतात दाखल झाल्या होत्या, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मला १३ फेब्रुवारीपर्यंत कोणताही ईमेल मिळाला नाही. त्यानंतर मी प्रवासात होते. भारतात विमानतळावर तेथील अधिकारीही आपल्याशी उद्धटपणे वागल्याची तक्रार त्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com