रागाच्या भरात भावाने चिरला बहिणीचा गळा; जेवण तयार न केल्याचे कारण

Brother kills sister in uttar pradesh
Brother kills sister in uttar pradeshBrother kills sister in uttar pradesh

उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची गळा चिरून हत्या (Brother kills sister) केली. हे प्रकरण मुबारकपूर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या इब्राहिमपूर गावातील आहे. जेवण न केल्याने भावाने बहिणीवर धारदार शस्त्राने (knife attack) वार केले. यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करीत आहे. शमसाद अहमद (४०) असे आरोपी भावाचे नाव आहे. तर हजारा असे मृत बहिणीचे नाव आहे. (Brother kills sister in uttar pradesh)

शेजारी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस चौकशीत भावानेच धारदार शस्त्राने वार करून बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हजारा ही भाऊ शमशाद अहमद ऊर्फ ​​मानकू याच्यासोबत घरी राहत होती. त्यांच्या आई-वडिलांचा आधीच मृत्यू झाल आहे.

Brother kills sister in uttar pradesh
साळीला मारहाण करणे भोवले; आपचे आमदार बलबीर सिंग यांना शिक्षा

हजारा अविवाहित होती. शमसाद अहमद हा गावात मजुरीवर हातगाडी चालवतो. अहमद हा लग्नात भांडी नेण्याचे काम करतो. सोमवारी घटनेच्या दिवशी तो कामावरून घरी आल्यानंतर बहिणीला जेवण मागितले. मात्र, बहिणीने जेवण तयार केले नव्हते. यामुळे शमसाद संतापला.

त्याने बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने आधी बहिणीला चप्पलने मारले. मारहाण करताना त्याच्या हातात भाजी कापण्याचा चाकू (knife attack) लागला. त्याने बहिणीवर हल्ला करून खून (Murder) केला. मृत हा तीन भावंडांपैकी दुसरा असल्याचे सांगण्यात येते.

Brother kills sister in uttar pradesh
इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

आरोपीला अटक, चौकशी सुरू

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने बहिणीची धारदार शस्त्राने हत्या (Brother kills sister) केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मोठ्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एसपी आझमगड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com