दहशतवाद्याचा भाऊ काश्मिरमध्ये फडकवतोय तिरंगा; म्हणाला,"पाकिस्तान हा भिकारी देश"

तिरंगा फडकवल्यानंतर आपल्या दहशतवादी भावाला दहशतवादाचा मार्ग सोडण्याचा दिला सल्ला.
दहशतवाद्याचा भाऊ काश्मिरमध्ये फडकवतोय तिरंगा; म्हणाला,"पाकिस्तान हा भिकारी देश"

नुकताचं एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओमध्ये दहशतवादी जावेद मट्टूचा भाऊ रईस मट्टू स्वातंत्र्य दिनापूर्वी तिरंगा फडकवताना दिसतोय. आता यावर रईस मट्टूने याने त्याचे मत व्यक्त आहे. मट्टू म्हणाला की, त्याने मनापासून तिरंगा फडकवला असून त्यामागे कोणचाही दबाव नव्हता.

रईस मट्टू म्हणाला की, आम्ही भारतीय होतो,आहोत आणि राहू. जम्मू-काश्मिरबाबत मट्टू म्हणाले की, आता येथे विकास होतोय. यादरम्यान त्याने आपल्या भावाबद्दलही बोलून दहशतीचा वाईट मार्ग सोडून परत येण्याची विनंती केली.

सारे जहां से अच्छा, हिंदोस्तां हमारा-

रईस मट्टू म्हणाला की, मी मनापासून झेंडा फडकवला. इच्छेने ओवाळलं. यावर कोणाचाही दबाव नव्हता. मट्टूने पूर्ण देशाला काश्मिरमध्ये येण्याचे आवाहन केले. त्यानंतर मट्टूने 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्ता हमारा' हे गाणं गायलं.

तो पुढे म्हणाले की," जम्मू-काश्मीरमध्ये आता विकास होतोय. मी 14 ऑगस्टला पहिल्यांदा दुकानात बसलोय, अन्यथा या निमित्ताने दुकान दोन-तीन दिवस बंद असायचे. रईस मट्टू याने खोर्‍यातील बिघडलेल्या परिस्थितीसाठी भूतकाळातील राजकारणाला जबाबदार धरले. तो म्हणाला की, पूर्वीचे राजकीय पक्ष खेळ खेळत होते. यात आम्हा गरीब लोकांचे हाल होत होते. आज न्याय मिळत आहे."(Latest Marathi News )

दहशतवाद्याचा भाऊ काश्मिरमध्ये फडकवतोय तिरंगा; म्हणाला,"पाकिस्तान हा भिकारी देश"
Section 377 of IPC : संसदेने कलम ३७७ रद्द केले मात्र हा कायदा नेमका काय होता ? समलैंगिकता म्हणजे काय

आज पाकिस्तान हा भिकारी देश आहे-

रईसने त्याचा भाऊ दहशतवादी जावेद मट्टूबाबत सांगितले की, तो २००९ मध्ये घरातून निघून गेला होता. दहशतवादी बनला. तो जिवंत आहे की मेला हे आम्हाला माहिती नाही. जर तो जिवंत असेल तर मी त्याला आवाहन करतो की मी त्याच्या येण्याची वाट पाहतोय. रईस म्हणाला की, आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही.

पाकिस्तान काश्मिरमध्ये काहीही करू शकत नाही. तो म्हणाला की, आज पाकिस्तान हा भिकारी देश आहे. तो आपल्याला काय देऊ शकतो? त्यानंतर तो म्हणाला की आम्ही भारतीय होतो, आहोत आणि राहू.(Latest Marathi News)

दहशतवाद्याचा भाऊ काश्मिरमध्ये फडकवतोय तिरंगा; म्हणाला,"पाकिस्तान हा भिकारी देश"
शरद पवारांची भूमिका स्पष्ट, संभ्रम होण्याच काही कारण नाही; अजित पवार गटाच्या नेत्याचं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com