

देशभरात मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) केंद्र सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव (केटीआर) यांनी शनिवारी ही घोषणा केली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे दक्षिण भारतीय राज्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत असलेली पक्षाची प्रमुख चिंता दूर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा