BSNL वापरत असाल तर मिळणार कॅशबॅक!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कॅशबॅक दिली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कॅशबॅक दिली जाणार आहे. ग्राहकांना एका एसएमएसमागे कॅशबॅक मिळणार आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांनी एसएमएस केल्यास संबंधित ग्राहकाला सहा पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे.

बीएसएनएलने यापूर्वी आपल्या ग्राहकांसाठी कॉलिंग केल्यावर दरमिनिटाला 6 पैशांचा कॅशबॅक देण्याची योजना आणली होती. त्यानंतर आता एसएमएस केल्यास ग्राहकाला सहा पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. त्यासाठी बीएसएनएलच्या ग्राहकांना ACT 6 paisa असा मॅसेज टाईप करून 9478053334 या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. BSNL वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. 

तसेच फोन केल्यानंतर किती वेळ रिंग वाजावी, याबाबतही 'ट्राय'ने निश्चित केले आहे. त्यानुसार, मोबाईल टू मोबाईल कॉल केल्यास 30 सेकंदांपर्यंत रिंग वाजणार तर मोबाईल टू लँडलाइनवर कॉलची रिंग 60 सेकंदापर्यंत वाजणार आहे.

ग्राहक वाढविण्यासाठी बीएसएनएलकडून प्रयत्न

वाढत्या मोबाईल नेटवर्कच्या स्पर्धेमुळे बीएसएनएल आपल्या ग्राहकांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीएसएनएलने कॉल केल्यास 6 पैशांचा कॅशबॅक ग्राहकांना दिला होता. त्यानंतर आता एसएमएसवरही 6 पैशांचा कॅशबॅक देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL will give you money for every SMS you send

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: