काँग्रेस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, मायावती चांगल्याच भडकल्या

'काँग्रेस सरकार दलित, आदिवासींचे प्राण आणि प्रतिष्ठा वाचवण्यात अपयशी ठरलंय.'
Mayawati Ashok Gehlot
Mayawati Ashok Gehlotesakal
Summary

'काँग्रेस सरकार दलित, आदिवासींचे प्राण आणि प्रतिष्ठा वाचवण्यात अपयशी ठरलंय.'

जालोर : राजस्थानमधील (Rajasthan) जालोर जिल्ह्यात (Jalore District) एका दलित विद्यार्थ्याला (Dalit Student) शाळेतील शिक्षकानं (Teacher) पाण्याच्या मडक्याला हात लावल्यामुळं बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Ahmedabad Civil Hospital) शनिवारी सकाळी 11 वाजता दलित विद्यार्थी इंद्र कुमारचा मृत्यू झालाय.

या घटनेमुळं राजस्थानातील अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी राजस्थानमधील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. त्या म्हणाल्या, 'काँग्रेस सरकार दलित, आदिवासींचे प्राण आणि प्रतिष्ठा वाचवण्यात अपयशी ठरलंय.'

Mayawati Ashok Gehlot
अपघातानंतर मेटे साहेब माझ्याशी बोलले, पण..; कार चालकानं सांगितला पहाटेचा थरारक प्रसंग

राजस्थानात जातीवादी घटना दररोज घडताहेत

मायावतींनी ट्विट केलंय की, "राजस्थानातील जालोर जिल्ह्यामधील सुराणामध्ये एका खासगी शाळेतील 9 वर्षांच्या दलित विद्यार्थ्याला तहान लागल्यावर माठातील पाणी प्यायल्यावर सवर्ण जातीच्या जातीयवादी विचारसरणीच्या शिक्षकानं त्याला निर्दयीपणे मारहाण केली. काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, "राजस्थानमध्ये अशा जातीय वेदनादायक घटना दररोज घडत आहेत. यावरून काँग्रेस सरकार दलित, आदिवासी, उपेक्षित इत्यादींच्या जीवनमानाचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळं या सरकारला हटवून तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली तर बरं होईल, असा त्यांनी संताप व्यक्त केलाय.

Mayawati Ashok Gehlot
जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण

काय आहे संपूर्ण प्रकरण

ही घटना जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील (Surana village) आहे. इंद्र मेघवाल या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शाळेत पाणी पिण्यासाठी पाण्याच्या मडक्याला स्पर्श केला होता. यावेळी शिक्षकानं त्याला बेदम मारहाण केली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, शिक्षक छैल सिंह यानं एवढी मारहाण केली की मुलाच्या कानाची नस फुटली. त्यांची प्रकृती गंभीर झाली. मुलाला जास्त वेदना होत असताना बगोडा, भीनमाळ, डीसा, मेहसाणा, उदयपूर या खासगी रुग्णालयात उपचारासाठी अनेक फेऱ्या मारल्या. त्यानंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. मात्र, शनिवारी सकाळी 11 वाजता इंद्र कुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जालोर जिल्ह्यातील सायला पोलिस ठाण्यात (Sayla Police Station) नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध खुनाचा आणि एससीएसटी अंतर्गत गुन्हा (SC/ST Act) दाखल केला. सुराणा येथील रहिवासी पोलाराम मेघवाल यांचा मुलगा किशोर कुमार यानं गुन्हा दाखल केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com