CBSE 12th Result : छोट्या शहरातील मुलगी ठरलीय अव्वल, मिळवलेत चक्क '५०० पैकी ५०० गुण'

सीबीएसई बोर्डातून बारावीची परीक्षा देणारी तान्या सिंग परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेत अव्वल आली आहे.
CBSE 12th Result : Tanya singh got first rank
CBSE 12th Result : Tanya singh got first rank esakal

पालकांना आणि विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची उत्सुकता होती तो क्षण म्हणजे १२ वी चा निकाल. बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीचा प्रवेश आणि मार्ग ठरत असतो. सीबीएसई बोर्डाचा बाराव्या वर्गाचा निकाल नुकताच लागलाय. यावेळीही बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. सीबीएसई बोर्डातून बारावीची परीक्षा देणारी तान्या सिंग परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेत अव्वल आली आहे. (bulandshahr dps student tanya singh topper in 12 cbsc board result declared today)

तान्या सिंग ही उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) ची विद्यार्थिनी आहे. तान्याला परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत.ऑल इंडिया टॉपर तान्याच्या निकालाने सगळ्यांनाच आनंद झालाय. तान्याच्या शाळेसाठी ही गर्वाची बाब आहे. त्यामुळे तान्याच्या डीपीएस शाळेत जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे.

डीपीएसची (DPS) तान्या जिथे अव्वल ठरली तिथे भूमिका गुप्ता हिने ५०० पैकी ४९९ गुण घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.तर सौम्या नामदेव या विद्यार्थिनीला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत.डीपीएस शाळेतील एकूण २५० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. शाळेचा निकालही १०० टक्के लागलाय. शाळेसाठी ही गर्वाची बाब असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले.

तान्या सिंग आणि भूमिका गुप्ताच्या गुणपत्रिका

सीबीएसई निकालाच्या आकड्यानुसार यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. १२ परीक्षेत ९४.५४ टक्के मुली तर ९१.२५ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. तर जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९८.९३ टक्के लागलाय.

CBSE 12th Result : Tanya singh got first rank
CBSC आणि युनिव्हर्सिटी टॉपर्सना PM बॉक्सची लॉटरी

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सीबीएसई टर्म १ बोर्डाची परीक्षा एमसीक्यू (MCQ) फॉरमॅटमध्ये झाली होती. बोर्डाच्या टर्म १ च्या निकालात पास,फेल आणि इसेंशियल रिपीटची माहिती देण्यात आली होती.आता टर्म २ बरोबर परीक्षेचा अंतिम निकाल लागलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com