CBSC आणि युनिव्हर्सिटी टॉपर्सना PM बॉक्सची लॉटरी

टीम ई-सकाळ
Monday, 25 January 2021

​- शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

Republic Day 2021: नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. उद्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

पीएम बॉक्समध्ये बसून राजपथावर होणारी परेड पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनाही भेटता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत टॉपर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनाही ही सुवर्णसंधी मिळणार आहे. शिक्षणमंत्री या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुकाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करणार आहेत. 

UPSC 2021: पूर्वपरीक्षेसंदर्भात आली महत्त्वाची अपडेट​

यंदा ४०१ लोक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार
शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना यंदा पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी मिळेल, हे कळविण्यास आम्हाला आनंद होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. यंदा कोरोनामुळे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ६०० जण यात सहभागी  झाले होते. यंदा ही संख्या ४०१ पर्यंत कमी करण्यात आली आहे. 

इंजिनिअर्स तरुण-तरुणींनींना SBIमध्ये नोकरीची संधी; कोणतीही लेखी परीक्षा नाही​

दिल्लीच्या चार शाळांमधील विद्यार्थी होणार सामील
दिल्लीमधील ४ शाळांमधील एकूण ३२१ विद्यार्थी आणि कोलकत्तामधील ८० कलाकार राजपथावरील परेडच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने याआधीच दिली होती. कोलकत्तामधील ईस्टर्न जोनल कल्चरल सेंटरने कलाकारांची निवड केली आहे. तर डीटीईए सीनिअर सेकंडरी स्कूल, माउंट अबू पब्लिक स्कूल, विद्या भारती स्कूल आणि गव्हर्नमेंट गर्ल्स सीनिअर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meritorious students across India will be given chance to witness Republic day 2021