
रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे पशु पक्ष्यांची घरे नष्ट होतायत आणि पशु पक्षी बेघर होत आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रात्रीच्या अंधारात मोर ओरडताना दिसत आहेत. हैदराबाद विद्यापीठात ४०० एकर जमिनीवरील झाडं तोडत असताना तिथल्या मोरांचा हा आवाज आहे. मोरांच्या ओरडण्याचा हा आवाज वेदनादायी आहे.