‘बुरेवी’मुळे चेन्नईला पावसाने झोडपले

वृत्तसंस्था
Saturday, 5 December 2020

‘बुरेवी’मुळे तमिळनाडू व  पुदुच्चेरीत पाऊस पडत असून चेन्नईतील टी नगरमध्ये पावसाचे पाणी साचले होते. वादळाचा धोका लक्षात घेऊन तिरुअनंतपुरममधील विमानतळ आज बंद ठेवला होता. याआधी तमिळनाडूतील मदुराई व तुतिकोरीन विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. बुरेवीचा वेग मंदावल्याने केरळमधील दहा जिल्ह्यातील ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने काल रात्री उशिरा मागे घेतले.

चेन्नई/तिरुअनंतपुरम - बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र त्याचा प्रभावाने चेन्नईसह तमिळनाडूतील अनेक भागात व पुदुच्चेरीतीला पावसाने झोडपून काढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बुरेवी’मुळे तमिळनाडू व  पुदुच्चेरीत पाऊस पडत असून चेन्नईतील टी नगरमध्ये पावसाचे पाणी साचले होते. वादळाचा धोका लक्षात घेऊन तिरुअनंतपुरममधील विमानतळ आज बंद ठेवला होता. याआधी तमिळनाडूतील मदुराई व तुतिकोरीन विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. बुरेवीचा वेग मंदावल्याने केरळमधील दहा जिल्ह्यातील ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने काल रात्री उशिरा मागे घेतले. पावसामुळे पुदुच्चेरीतील बाधित भागांची पाहणी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केली.

farmer protest: 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा; शेतकऱ्यांचा 'आर या पार'चा निर्धार

उद्यापर्यंत पावसाचा इशारा
मन्नारच्या आखाताजवळ काल आल्यानंतर बुरेवी चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली. त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. चक्रीवादळाची तीव्रता शनिवारपर्यंत (ता. ५) कमी होणार असली तरी तमिळनाडू, पुदुच्चेरी, लक्षद्विप व आंध्र प्रदेशमधील दक्षिण किनारपट्टीवर उद्यापर्यंत पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burevi Cyclone Chennai Rain Loss