'बरनॉल'ची चर्चा पुन्हा रंगली; नेटकऱ्यांनी भाजपची केली परतफेड!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

बरनॉल क्रीम चर्चेत येण्याची ही दुसरी वेळ. याअगोदर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप समर्थकांनी विरोधी पक्षांवर तोंडसुख घेताना बरनॉल वापरण्याचा सल्ला दिला होता.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी पूर्णविराम मिळाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राज्यातील सत्तापेच कायमचा सुटला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भाजपला टार्गेट करत जोरदार टीकेचा भडीमार केला. मात्र, यामध्ये बरनॉल क्रीमचे मीम्स चांगलेच गाजले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर यात वाढ झाली. 

- जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बरनॉल क्रीम चर्चेत येण्याची ही दुसरी वेळ. याअगोदर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप समर्थकांनी विरोधी पक्षांवर तोंडसुख घेताना बरनॉल वापरण्याचा सल्ला दिला होता. याची परतफेड काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाच्या समर्थकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणून केली. 

- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक; विकास दर सहा वर्षांतील निचांकी पातळीवर

निकालाअगोदरच वेगवेगळ्या पोलच्या माध्यमातून मोदी सरकारला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर भाजप समर्थकांनी बरनॉल लावा, असा टोला विरोधकांना लगावला होता.

- पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burnol is trending on Twitter after maharashtra government formation