Accident News : लग्नावरुन परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला! ५ जणांच्या मृत्यू, १५ जखमी

Accident News
Accident News

Accident News : जालौनमधून एक मोठी बातमी आहे. ४० जण असलेल्या बसला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बसमध्ये वऱ्हाडी होते.

अपघातानंतर बसचे दोन्ही दरवाजे बंद होते. त्यामुळे पोलिसांनी बसचे छत गॅस कटरने कापले. यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. ही घटना मधौगड कोतवाली भागात घडली. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Accident News)

अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ इराज राजा हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिस अधीक्षक डॉ इराज राजा म्हणाले, "आम्हाला पहाटे २ वाजता अपघाताची माहिती मिळाली. यानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि पोलीस पाठवण्यात आले आहेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनाने पळ काढला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Accident News
Manipur Violence: सुट्टीवर घरी आलेल्या कमांडोची गोळ्या घालून हत्या! CRPFनं दिले महत्वाचे आदेश

मडेरा येथील रहिवासी मुलचरण पाल यांची दोन मुले सुनील आणि प्रमोद यांचे लग्न रामपुरा येथील रामधानीच्या दोन मुली संध्या आणि उपासना यांच्याशी झाले होते. शनिवारी रात्री लग्नाला उपस्थित राहून सर्व वऱ्हाड बसने परतत होते. यावेळी समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच राडा झाला.

पोलिसांनी मोठ्या कष्टाने घटनास्थळी पोहोचून बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ उपचारासाठी मधळगड सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Accident News
Mallikarjun Kharge : बदनामी केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेकडून खर्गेंना नोटीस; शंभर कोटी रुपये...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com