Anand_Mahindra
Anand_Mahindra

आनंद महिंद्रांनी दिलेली गेम सोडवा अन् फिरायला जा!

Published on

कोरोना व्हायरस या महामारीमुळे पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने सरकारने ही बंदी उठवली असली तरी आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवास करणं सध्या जिकीरीचं झालं असलं तरीदेखील सावधगिरी बाळगत अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. 

जगभरातील जवळपास सर्वच देशांनी मार्चमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी केली होती. कोरोनाचा प्रसार कमी व्हावा यासाठी जास्तीत जास्त लोक घरात राहण्याचा प्रयत्न करत होते. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विटर फॉलोअर्सना पुढील हॉलिडे प्लॅनसाठी मदत करत आहेत. त्यांनी ट्विटरवर एक नवा गेम शेअर केला आहे. कोरोनाकाळात आनंद महिंद्रा लोकांना फिरायला जा असं कसं काय सुचवू शकतात, याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, यातही एक ट्विस्ट आहे. 

महिंद्रा यांनी एक गणितीय खेळ ट्विटरद्वारे मांडला आहे. कोरोना काळात प्रवास करावा की नाही, हे त्यांच्या फॉलोअर्सना या गेमद्वारे सूचवत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमधून असे दिसत आहे की, त्यांनी १५ ऑप्शन्स दिले आहेत. यापैकी पहिल्या ९ ऑप्शन्सपैकी कोणत्याही एकाची निवड तुम्हाला करायची आहे. त्याला तीनने गुणाकार करून त्यात तीन मिळवायचे आहेत. आलेल्या संख्येला पुन्हा एकदा तीनने गुणायचे आहे. आलेल्या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज करायची आहे. शेवटी जे उत्तर येईल, त्या देशात तुम्ही फिरायला जाऊ शकता. असा हा खेळ आहे. 

मजेशीर गोष्ट म्हणजे, तुम्ही या गेममध्ये कोणतीही संख्या निवडली तरी उत्तर ९ येणार आहे. या क्रमांकाचा पर्याय घरी राहा असा आहे. 

ही पोस्ट करताना आनंद महिंद्रांनी म्हटले आहे की, क्रूर पण अचूक'. आनंद महिंद्रा यांनी अत्यंत हुशारीने लोकांना घरीच राहायला सांगितले आहे. त्यांच्या या पोस्टला लोकांनी पसंती दिली आहे, तसेच त्यांचे कौतुकही केले आहे.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com