esakal | गर्भवती पत्नी; समोर चिमुकला अन् दारूसाठी तडफड...
sakal

बोलून बातमी शोधा

man allegedly shoots pregnant wife after refused to give money to buy liquor at up

राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीराम दुकानांसमोर गर्दी करू लागले आहे. तळीराम दारू मिळवण्यासाठी नको ते प्रयत्न करताना दिसतात. पण, यामुळे कौटुंबिक अत्याचाराच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. एका घटनेत गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे.

गर्भवती पत्नी; समोर चिमुकला अन् दारूसाठी तडफड...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): राज्य सरकारने नियमावली घालून दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर अनेक तळीराम दुकानांसमोर गर्दी करू लागले आहे. तळीराम दारू मिळवण्यासाठी नको ते प्रयत्न करताना दिसतात. पण, यामुळे कौटुंबिक अत्याचाराच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. एका घटनेत गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे.

Video: एवढी मोठी रांग कशासाठी असेल बरं...

लॉकडाउनला 42 दिवस पूर्ण झाल्यानंतर 1 मे रोजी सरकारने काही अटींसह रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्यविक्री करण्यास परवानगी दिली. परवानगी नंतर दारूची दुकाने सुरू झाली आहेत. ठिकठिकाणी गर्दी दिसत आहे. संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. पण, उत्तर प्रदेशात दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पतीने गोळी झाडून पत्नीची हत्या केली. विशेष म्हणजे त्याने आपल्या मुलासमोरच पत्नीला गोळी झाडली.

Video दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दीपक आणि नेहा (वय 25) यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दीपकने चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीकडे दारूसाठी पैसे मागितले. पण, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. पत्नी पैसे देत नसल्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी त्यांचा चार वर्षाचा मुलगाही तेथेच उपस्थित होता. पत्नी दारूसाठी पैसे देत नसल्यामुळे चिडलेल्या नवऱयाची दारूसाठी तडफड होऊ लागली. चिडून त्याने पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली आणि घरातून पळ काढला. वडील पळून गेले आणि आई मुत्युमुखी पडल्यामुळे घाबरलेला चार वर्षांचा मुलगा शेजारी असलेल्या झुडपात जाऊन लपून बसला. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. झुडपातून मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दारूचा खंबा हातात पडला अन् लागला की...

loading image
go to top