Success Story
Success Storyesakal

Success Story : वयाच्या १८व्या वर्षी डॉक्टर, नंतर IAS अन् आता यशस्वी उद्योजक, कोण आहे ही व्यक्ती?

Businessman Success Story : अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं IAS होण्याचं, पण या पठ्ठ्यानं ते सोडून उद्योजक झाला आहे.
Published on

Quit job as IAS officer To Build Company : भारतातील लाखो लोकांचे IAS अधिकारी होण्याचे आणि UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते. जगातील सर्वात कठीण भरती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इच्छुकांनी अनेक वर्षे तयारी केलेली असते. बहुतेकांसाठी, आयएएस बनणे हे अंतिम ध्येय असताना, चक्क IAS ची नोकरी सोडली.

एड-टेक प्लॅटफॉर्म 'Unacademy'चे सह-संस्थापक म्हणून रोमन सैनी, आता प्रसिद्ध आहेत. तो एकेकाळी IAS अधिकारी म्हणून काम करत होता.

सैनी निःसंशयपणे देशातील सर्वात कुशाग्र लोकांपैकी एक आहेत. प्रतिष्ठित AIIMS मध्ये प्रवेश मिळवला आणि वैद्यकीय महाविद्यालयात स्वतःची जागा निर्माण केली. तेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर, 18 वर्षांच्या रोमन सैनीने एम्समधील नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर (NDDTC) मध्ये 6 महिने काम केले.

22 व्या वर्षी, सैनीने आणखी एक आव्हानात्मक शोध सुरू केला आणि वयाच्या 22 व्या वर्षी UPSC CSE उत्तीर्ण केले. त्यांनी मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून काम केले.

Success Story
PSI Success Story : प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कटलरी व्यावसायिकाचा मुलगा बनला ‘पीएसआय’

त्यानंतर त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मित्र गौरव मुंजाळ याच्यासोबत युनाकॅडमी या लोकप्रिय ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मची स्थापना केली. यूपीएससी कोचिंग क्लासेससाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही युनाकेडमीची कल्पना होती, ज्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत.

अभियंता झाला उद्योगपती या गौरव मुंजाळ यांच्या YouTube चॅनेलने या व्यावसायिक साम्राज्याचा पाया म्हणून काम केले, पण Unacademy ही 26000 कोटी रुपयांची कंपनी बनवण्याचे श्रेय आहे ते म्हणजे डॉक्टर आणि माजी IAS अधिकारी रोमन सैनी यांचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com