लॉकडाउनमध्येही उच्चांकी गहू खरेदी

wheat
wheat

नवी दिल्ली - सरकारने २०२०-२१ या वर्षात तीन कोटी ८२ लाख टन गहू खरेदी केला आहे. आत्तापर्यंतची ही उच्चांकी खरेदी आहे. देशातील सर्वांत मोठे गहू उत्पादक राज्‍य असलेल्या पंजाबवर यंदा मध्य प्रदेशने मात केली आहे. या खरेदीमुळे देशातील सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून, गव्हासाठी सरकारने किमान आधारभूत किमती (एमएसपी) द्वारे ७३ हजार ५०० कोटी रुपये त्यांना दिल्याची माहिती केंद्रीय खाद्य मंत्रालयाने दिली आहे. 

२०१२ चा उच्चांक मोडला
गव्हाच्‍या खरेदीचा काळ एप्रिल ते मार्च असा असला तरी साधारणतः पहिल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. राज्य पातळीवरील भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि राज्यातील संस्थाकडून गव्हाची हमी भावाने खरेदी केली जाते. गहू खरेदीचा आधीचा उच्चांक २०१२-१३ मधील असून, त्या वेळी सरकारने तीन कोटी ८१ लाख ८० हजार टन गहू खरेदी केला होता. २०१९-२० मध्ये तीन कोटी ८१ लाख ३० हजार टन गहू खरेदी झाली होती. केंद्रीय पातळीवर सर्वांत मोठे गहू उत्पादकाचा मान या वेळी मध्य प्रदेशला मिळाला आहे. पंजाबचे स्थान या वेळी घसरले आहे, अशी माहिती खाद्य मंत्रालयाने दिली.

शेतीविषयी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तरीही उद्दिष्ट पूर्ण
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे देशात लॉकडाउन असल्याने गहू खरेदीसाठी पंधरवड्याचा विलंब झाला. गव्हाचे मुबलक उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये १५ एप्रिलपासून खरेदीला प्रारंभ झाला. तरीही गहू खरेदीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे खाद्य मंत्रालयाने सांगितले. यंदा लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यासाठी बाजारपेठेत गव्हाची आवक होताना टोकन पद्धतीचा वापर करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com