esakal | भाजपने केला डॉ. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सीएए आणि एनआरसी हे दोन कायदे आणले आहेत. सीएएनुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानील बिगर मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. मुस्लिमांचा यामध्ये समावेश नाही.

भाजपने केला डॉ. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत असताना सत्ताधारी भाजपने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये मनमोहनसिंग यांनी शरणार्थींविषयी वक्तव्य केले होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सीएए आणि एनआरसी हे दोन कायदे आणले आहेत. सीएएनुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानील बिगर मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. मुस्लिमांचा यामध्ये समावेश नाही. या कायद्यावरून सध्या देशभर आंदोलन होत आहे. या आंदोलनात काँग्रेससह इतर अनेक पक्ष सहभागी आहेत. 

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

त्यामुळे भाजपने काँग्रेसला घेरण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. मनमोहन सिंग यांनी 2003 मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मनमोहन सिंग बांगलादेशात धार्मिकतेवरून हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शरणार्थींसाठी सरकारने सहानुभीतीची भूमिका घेतली पाहिजे असे म्हणताना दिसत आहेत. केंद्रात 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार होते. त्यावेळी राज्यसभा सदस्य असलेले मनमोहनसिंग यांनी तत्कालिन उप पंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना भाषण केले होते. 

जामिया हिंसाचारावर अखेर प्रियांका चोप्रा बोलली, म्हणाली...

मनमोहनसिंग म्हणाले होते, की मी शरणार्थींच्या समस्या तुमच्यासमोर मांडू इच्छितो. फाळणीनंतर शेजारी देश बांगलादेशमध्ये धार्मिकतेवरून नागरिकांचा छळ केला गेला. जर पीडित लोक आपल्या देशात येत असतील तर त्यांना आश्रय दिला पाहिजे. आपण तेवढी उदारता दाखवली पाहिजे. गांभीर्याने नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे पहावे, असे मी उपपंतप्रधान यांचे लक्ष वेधायचे आहे.

loading image