आम्हाला गद्दार म्हणता, हिंमत असेल तर अजितदादांना म्हणून दाखवा; शिरसाट यांचे ठाकरेंना आव्हान

Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
Updated on

मुंबई - शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात हल्ले प्रतिहल्ले झाले होते. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने गद्दार म्हणत टीका करण्यात आली होती. तसेच बंड आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे. मात्र अजित पवार गटाला शरद पवार गटाकडून कोणीही गद्दार म्हटलं नाही. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.

Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
Crime news : अजब! हॉटेलमध्ये नेवून पतीने कापला पत्नीचा हात; आरोपी घटनस्थळावरून फरार

ठाकरे गटावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, काहीही करून आता लोकांच्या मनावर परिणाम होणार नाही. आम्हाला गद्दार म्हणतात, अजितदादाला गद्दार म्हणून दाखवाा, हिंमत आहे का? स्वतःचे घर भरण्यासाठी यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार विकले...त्यांनी काय लपवले, दडवले काही दिवसानंतर बाहेर येईल.

दरम्यान ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसतील पण पैसे नाही असं आम्ही तरी म्हणू शकत नाही. आम्ही बरंच जवळून पाहिलं. त्यांना आउंटगोइंग नको फक्त इनकमिंग पाहिजे, खोके छोटा शब्द आहे, तिकडे कंटेनर आहेत. राज ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले होते, असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
Sharad Pawar : आम्ही थेट, तर शरद पवार गनिमी काव्याने लढतायत; उद्धव ठाकरे गटाचं सूचक विधान

दरम्यान शरद पवार यांच्या अजित पवार आमचेच नेते आहेत, या विधानावर शिरसाट म्हणाले की, पवार साहेबांनी काही तासातच वक्तव्य बदलले, हा गोंधळ का सुरू आहे, कारण काही लोकांना शरद पवार साहेबांची भूमिका कळत नाही. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणाले होते की, विश्वासघात होऊ शकतो, तरी त्यांच्या साहेबांना हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा आणि बडबड भोंग्याला लाथ मारून बाहेर काढावे. संजय राऊत म्हणतात हा गनिमी कावा आहे. अहो, हे अकलेचे तारे तोडत असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com