

loksabha
esakal
लोकसभा सभापती ओम बिरला येत्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेस (TMC) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांतील बंडखोर खासदारांच्या पक्षांतर प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा निर्णय येण्याची अपेक्षा सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. सभापतींनी दोन्ही मूळ पक्षांच्या नेत्यांसोबतच बंडखोर गटांच्या प्रतिनिधींनाही भेटी घेतल्या आहेत.