esakal | Bihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

chirag paswan narendra modi.jpg

जेव्हा एखादा पक्ष रालोआतून बाहेर पडतो. तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा वापर करण्यास त्यांना परवानगी दिली जात नाही. 

Bihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पाटणा- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने मत मागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपने लोकजनशक्ती पार्टीला (लोजपा) संदेश दिला आहे. भाजपमधील सूत्रांनी म्हटले की, लोजपाने बिहार निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नाव घ्यायचे नाही असे सांगितले आहे. कारण बिहारमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. 

लोजपाने कोणत्याही बॅनर, पोस्टर किंवा भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नाव घ्यायचे नाही, असे सांगितले आहे. जेव्हा एखादा पक्ष रालोआतून बाहेर पडतो. तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा वापर करण्यास त्यांना परवानगी दिली जात नाही. 

हेही वाचा- 'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

नुकताच लोजपा प्रमुख चिराग पासवान यांनी म्हटले होते की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना आपले नेते मानतात. त्यामुळे ते त्यांच्या नावाने मत मागणार. या घोषणेनंतर चिराग पासवान यांनी टि्वटरवर एक छायाचित्र शेअर केले होते. त्यात ते पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिसत आहेत. 

चिराग पासवान यांच्या या वक्तव्यानंतर जदयूने भाजपला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यानंतर भाजपने बिहारमध्ये लोजपाबरोबर कोणत्याही प्रकारची युती नसल्याचे म्हटले. 

हेही वाचा- आता 'बासमती तांदळा'साठी पाकिस्तान भारताशी लढणार, जाणून घ्या नवा वाद

दरम्यान, लोजपाने बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. लोजपा स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. विशेष म्हणजे लोजपा केंद्रात रालोआमध्ये सहभागी आहे.