esakal | पाक सैन्य आणि ISIने मला पाठवलं; भारताने जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याची कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

पाक सैन्य आणि ISIने मला पाठवलं; दहशतवाद्याची कबुली

पाक सैन्य आणि ISIने मला पाठवलं; दहशतवाद्याची कबुली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उरीमध्ये (jammu-kashmir) एका जिवंत दहशतवाद्याला पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. अली बाबर असं या दहशतवाद्याचं नाव आहे. या बाबरने पाकिस्तानी (indian army) सैन्य आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हीस इंटेलिजेन्सचा पर्दाफाश केला आहे. बाबरने कॅमेऱ्यासमोर ज्या गोष्टींचा खुलासा केला आहे त्यामुळे पाकिस्तानचा मुखवटा जगासमोर उघडा पडला आहे. 19 वर्षीय बाबरने आपल्या वक्तव्यात हे मान्य केलंय की, त्यांना पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयनेच भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी (Pakistan infiltrator) करण्यासाठी मदत केली आहे. आयएसआयच्या लोकांनी भारतीय सैन्याबाबत चुकीच्या गोष्टी सांगून आणि दाखवून त्याचं ब्रेनवॉश केला तसेच दहशतवादाच्या मार्गावर आणण्यासाठी त्याची दिशाभूल केली गेली आहे.

हेही वाचा: उरीमध्ये इंडियन आर्मीने पकडला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी

ISI ने बाबरला दाखवलं 50 हजाराचं आमिष

बाबरने मान्य केलंय की, पाकिस्तानी सैन्य आणि ISI ने त्याला म्हटलं होतं की, त्याची आई आजारी असल्याने तिला उपचारांची गरज आहे. त्याचं शिक्षण अर्धवट सोडून त्याला दहशतवादाच्या या रस्त्यावर ढकललं गेलं. ISI ने त्याला 50 हजारांचं आमिष दाखवलं होतं. बाबरला 20 हजार रुपये एडवान्स देखील देण्यात आले होते. बाबरच्या सांगण्यानुसार, त्याला सहा आठवडे ट्रेनिंग दिली गेली होती आणि पाकिस्तानी सैन्य तसेच ISI ने त्याला दहशतवादी मार्गावर आणलं.

हेही वाचा: अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र

भारतीय सैन्याबाबत दिली चुकीची माहिती

बाबरने म्हटलंय की, तंजीममध्ये ट्रेनिंगसाठी जेंव्हा त्याला पाठवण्यात आलं तेंव्हा त्याला काही व्हिडीओ दाखवण्यात आले. त्याला सांगण्यात आलं की, काश्मीरमध्ये भारतीय सैन्य सामान्य लोकांवर अन्याय करत आहे. मात्र, जेंव्हा तो इथे आला तेंव्हा त्याला याप्रकारचं काहीही दिसून आलं नाही. बाबरने म्हटलंय की, अशा प्रकारचा अन्याय त्याला दिसून आला नाही.

डियन आर्मीने पकडला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. दुसऱ्या घुसखोराचा सैन्याने खात्मा केला आहे. उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात आल्याचं लष्करातील सूत्रांनी सांगितले. १८-१९ सप्टेंबरपासून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. ताब्यात असलेला दहशतवादी याच मोहिमेवर होता, असे सूत्रांनी सांगितले. नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या गोळीबारात चार जवान गोळी लागून जखमी झाले आहेत. मागच्या दोन दिवसात उरीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी शिरलेल्या या दहशतवाद्यांचा लष्कराने माग काढला आहे. आतापर्यंत एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून लष्कर अन्य दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.

loading image
go to top