esakal | आंदोलन मागे घ्या, अन्यथा दिल्ली दंगलीसारखी अवस्था करु; शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या रागिनीविरोधात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

farm123

दिल्ली पोलिसांनी रागिनी तिवारी उर्फ जानकी बहनविरोधात सोशल मीडियावर उघडउघड धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे

आंदोलन मागे घ्या, अन्यथा दिल्ली दंगलीसारखी अवस्था करु; शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या रागिनीविरोधात तक्रार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी रागिनी तिवारी उर्फ जानकी बहनविरोधात सोशल मीडियावर उघडउघड धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. उत्तर पूर्व दिल्ली पोलिसांनी रागिनी तिवारीविरोधात आयपीसी 153 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. दिल्लीच्या सीमा भागात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियावर धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

95 वर्षांची आजी सगळ्यांवर भारी! व्हिडिओ पाहून व्हाल आवाक

सोशल मीडियावर रागिनी तिवारी यांनी एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता. 17 डिसेंबरपर्यंत शेतकरी रस्त्यावरुन हटले नाहीत, तर त्यांची अवस्था दिल्ली दंगलीदरम्यान जाफराबादमध्ये लोकांशी जशी झाली होती, तशी करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. 

रागिनी तिवारी यांच्याविरोधात जाफराबाद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते तेथे नव्हत्या. सध्या पोलिसांनी समन्स जारी करत प्रकरणाची चौकळी सुरु केली आहे. स्वत:ला हिंदूत्ववादी नेता म्हणवणाऱ्या रागिनी तिवारी यांची दिल्ली दंगलीमध्ये काय भूमिका होती? याचाही पोलिस तपास घेत आहेत. दिल्ली दंगलीदरम्यान मौजपूर चौकात भडखाऊ भाषण देणे आणि दगडफेकीसाठी उकसावणे अशा संबंधीचे त्यांचे व्हिडिओ पोलिसांना दोन महिन्यापूर्वी मिळाले आहेत.  

loading image
go to top