अलिगडमधील दहा हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल; उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

15 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास 10 हजार विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जमले. त्यांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली/अलिगड : नागरिकत्व सुधारित कायद्यास विरोध करणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) सुमारे दहा हजार अज्ञात विद्यार्थ्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंधरा डिसेंबर रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नागरिकत्व सुधारित कायदा आणि एनआरसीविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. 

पंधरा डिसेंबर रोजी एएमयूच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये मोर्चा काढला आणि मुख्य प्रवेशद्वार पाडले होते. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यावरून एएमयू विद्यार्थी संघटना आणि उत्तर प्रदेश पोलिस आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

- तोंडी तलाकपीडितांना आर्थिक आणि कायदेशीर मदत जाहीर!

104 तुकडीचे कमांडंट यांनी 24 डिसेंबरला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 15 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास 10 हजार विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जमले. त्यांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केली. त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली आणि सरकारी गाड्यांची नासधूस केली.

- चंद्रकांत पाटील म्हणतात, 'जयंत पाटील शिवसेनेचे वकील आहेत का?'

आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी सुरुवातीला कमीत कमी सुरक्षा दलाचा वापर करण्यात आला. पाण्याचा फवाराही मारण्यात आला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीमार करावा लागला. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी 

मुझफ्फरनगर येथे 20 डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी तपास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.

- दाऊदचा बर्थडे, डोंगरीमध्ये सेलिब्रेशन..

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितसिंह यांनी म्हटले आहे की, मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे आणि जबाबदार व्यक्तीकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. प्रशासनाकडे 25 दावे दाखल असून, त्यानुसार भरपाईसाठी काम सुरू झाला आहे. ओळख पटलेल्या जबाबदार व्यक्तीला नोटीस पाठविली जाईल, असे नमूद केले. याप्रकरणी 40 गुन्हे दाखल झाले असून, 73 जणांचा ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case registered against 10000 unidentified students of Aligarh Muslim University