
केंद्र सरकारने जनगणनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढच्या जनगणनेसोबत जात निहाय जनगणना केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला मोठा दणका दिलाय. इंडिया आघाडीत राहुल गांधींसह अनेक नेते सतत जात निहाय जनगणनेची मागणी करत होते. आता केंद्र सरकारने याबाबत घोषणा केल्यानंतर जात निहाय जनगणनेचा मुद्दाच विरोधकांकडे राहिला नाही.