Caste Census Bihar : सर्व धर्माच्या जाती-पोटजातींची मोजणी होणार

Nitish kumar said castes and sub-castes of all religions will be counted
Nitish kumar said castes and sub-castes of all religions will be countedNitish kumar said castes and sub-castes of all religions will be counted

बिहारमध्ये जातीय जनगणनेचा (Caste Census) मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. १) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वसंमतीने मोजणीबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय मसुद्याच्या स्वरूपात घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणले जातील. सर्व धर्माच्या जातींबरोबरच पोटजातींचीही मोजणी केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मोजणीसाठीही कालमर्यादा निश्चित केली जाईल, असे बैठकीनंतर नितीश कुमार (Nitish kumar) म्हणाले. (Nitish kumar said castes and sub-castes of all religions will be counted)

सर्वांनीच जात जनगणना (Caste Census) झाली पाहिजे असा कौल दिला आहे. जातीची जनगणना व्हायला हवी असा सर्वांच्या सहमतीने निर्णय झाला आहे. यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ते कालमर्यादेत पूर्ण केले जाईल. वेळही खूप कमी ठेवला जाईल. मोजणीसाठी विशेष प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशांचीही व्यवस्था केली जाईल, असेही नितीश कुमार (Nitish kumar) म्हणाले.

Nitish kumar said castes and sub-castes of all religions will be counted
नॅशनल हेराल्ड प्रकरणात कसे अडकले सोनिया आणि राहुल गांधी? काय आहे प्रकरण

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपचे उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद, राजदचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि खासदार मनोज झा उपस्थित होते. एमआयएमच्या वतीने अख्तरुल इमान, काँग्रेस आमदार अजित शर्मा, आमदार मेहबूब आलम या बैठकीला उपस्थित होते. बैठकीला २८ पक्षांचे प्रतिनिधी पोहोचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com