अलाहाबाद उच्च न्यायालयाने OBC च्या 18 जातींचा समावेश SC कॅटेगरी मध्ये करण्याच्या सुचनेला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार समाजवादी पार्टी आणि योगी सरकारच्या दरम्यान या 18 जातीचा समावेश OBC मधून SC मध्ये करण्या बाबत सुचना आली होता.
उच्च न्यायालयाने 24 जानेवारी 2017 मध्ये या जातींचे प्रमानपत्र देण्यावर बंदी घातली आहे. या जाती मध्ये मझवार, कहार, कश्यप,केवट, मल्लाह, निषाद, कुम्हार, प्रजापती, धीवर, बिंद, भर, राजभार, धीमान, बाथम, तुरहा गोडिया, मांझी आणि मछुजा या जातींचा समावेश यात होता. दरम्यान याचिकाकर्ताने उच्च न्यायालयाने युक्तिवाद केला होता की कोणत्यीही जातीचा SC, OBC मध्ये समावेश करण्यचा आधिकार फक्त देशाच्या संसदेला आहे.
अखिलेश सरकारने शेवटच्या दिवसांमध्ये 22 डिसेंबर 2016 रोजी 18 जातींना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी केली. जिल्ह्यातील सर्व डीएमना आदेश जारी केला होता की, या जातीतील सर्व लोकांना ओबीसी ऐवजी एससी प्रमाणपत्र देण्यात यावे.
नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने 24 जानेवारी 2017 ला सुचनेला स्थगिती देण्यात आली होती. 24 जानेवारी 2019 मध्ये योगी सरकारने पुन्हा दुसरी सुचना जाहीर केली. या जातींचा OBC मधून SC मध्ये समावेश करण्याची सुचना दिली होती. उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यां कडून असा युक्तिवाद करण्यात आला की, अनुसूचित जातींची यादी भारताच्या राष्ट्रपतींनी तयार केली होती. त्यात कोणतेही बदल करण्याचा अधिकार फक्त देशाच्या संसदेला आहे. त्यात कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्याचा अधिकार राज्यांना नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.