सख्या बहिणींचे पती सख्खे भाऊ; दोघांचेही सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI and NIA to probe forced conversion

सख्या बहिणींचे पती सख्खे भाऊ; दोघांचेही सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप

पश्चिम बंगालमधील मालदा येथील दोन महिलांनी कलकत्ता उच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी त्यांच्या पतींना जबरदस्तीने इस्लाम धर्म (probe forced conversion) स्वीकारण्यास लावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने एनआयए आणि सीबीआयला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (CBI and NIA to probe forced conversion)

महिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांचे पती २४ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता एकाने त्यांच्या पतींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे (probe forced conversion) सांगत त्यांची तक्रार फाडली. यानंतर त्यांनी मालदाच्या एसपी कार्यालयात तक्रार केली. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीची हत्या; आरोपीची ओळख पटली

दोन्ही याचिकाकर्ते बहिणी आहेत. तसेच त्यांचे पतीही भाऊ आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पतींनी एका पक्षासाठी काम केल्याचे दोन्ही महिलांनी सांगितले. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पती बेपत्ता झाल्यानंतर याचिकाकर्त्यांनी मोथाबारी आणि कालियाचक पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या.

कौटुंबिक वादामुळे (Family disputes) याचिकाकर्त्यांचे पती सोडून मालदा येथील प्रतापपूर येथे राहत आहेत. दोन जणांनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला (probe forced conversion) आहे. त्यांनी घरी परतण्यासही नकार दिला आहे, असे उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्यातर्फे वकील मोहम्मद गालिब यांनी सांगितले. त्यांच्या पतींनी कलम १६४ अन्वये साक्ष दिली आहे की त्यांनी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: केंद्राचे महाराष्ट्रासह सहा राज्यांना पत्र; थकबाकीवरून दिला इशारा

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि एनआयएकडे सोपवला आहे. तसेच एसपी मालदा यांना या प्रकरणात सीबीआय आणि एनआयएला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांकडून सक्तीचे धर्मांतर, बनावट चलन, शस्त्रसाठा आणि सीमापार घुसखोरी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Cbi And Nia To Probe Forced Conversion Bengal Calcutta High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top