Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

CBI registers FIR against Essel Group Chairman Subhash Chandra: या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सुभाष चंद्रा यांनी २०२४ मध्ये आपली प्रत्यक्ष संपत्ती केवळ ३१.७९ कोटी रुपये असल्याचे सांगितले, तर २०१७-१८ दरम्यानही ती ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नव्हती असा दावा केला.
Subhash Chandra

Subhash Chandra

esakal

Updated on

LIC Housing Finance complaint: एस्सेल ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध माध्यम व्यावसायिक सुभाष चंद्रा यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलीय.

चंद्रा यांनी कर्ज मिळवण्यासाठी आपली संपत्ती खोटी व अवाजवी फुगवून दाखवून सरकारी वित्तीय संस्थेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही कर्जे नंतर थकीत झाल्यामुळे सरकारी कर्जदात्या संस्थेचे १,३२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com