पेट्रोल-डिझेलच्या 'शंभरी'वर सीतारमण म्हणाल्या, 'माझं उत्तर तुम्हाला पटणार नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 21 February 2021

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत

चेन्नई Petrol-Diesel Price Rise: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर (Petrol Price Rise) 95 रुपयांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी दरांनी शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आहे. सरकारने इंधनाच्या किंमती कमी करुन दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. इंधनवाढ सर्वांसाठी तापदायक असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

16 तास चाललेल्या चर्चेत भारताने चीनला सुनावलं; 'पूर्व लडाखमधील इतर...

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. भारतामधील पेट्रोलच्या किंमतीपैकी 60 टक्के हिस्सा केंद्र आणि राज्यांच्या करांचा आहे. मागील काही दिवसात राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोलच्या किंमती 100 रुपये प्रतिलिटरच्या वरती गेल्या आहेत. डिझेलच्या किंमतीपैकी 56 टक्के हिस्सा हा केंद्र आणि राज्यांना कराच्या स्वरुपात मिळतो. 

अर्थमंत्री एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. यात इंधनाचे दर कमी करण्याशिवाय अन्य कोणतेही उत्तर पचणार नाही. मला माहिती आहे की या विषयावर मी काहीही बोलू किंवा काहीही सांगू, सत्य सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते बनावट असल्याचं वाटेल. मी तुम्हाला उत्तर देण्यापासून वाचत आहे. मी माझ्यावर दोष घेण्यापासून वाचत आहे. सीतारमण पुढे म्हणाल्या की, पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा करांमध्ये आणले जाऊ शकते. यामुळे करावरील कर नष्ट होतील आणि यात एकरुपता येईल. सध्या केंद्र सरकार उत्पाद शुल्क वसुल करते, तर राज्य सरकार वेगवेगळ्या दरांवर व्हॅट शुल्क आकारते. 

कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत? टेन्शन येतंय? तर "या पाच' टिप्स करा फॉलो 

देशासह राज्यात इंधनाचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अभूतपूर्व स्थितीत येऊन पोहोचले आहेत. पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहेत. अशात केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करुन दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव विक्रमी खालच्या स्तरावर गेले होते. याचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात लक्षणीय वाढ केली होती. पण, आता इंधनाचे दर गगनाला भीडत असताना केंद्र सरकार उत्पादन शुल्कात घट करण्याची कोणतीही हालचाल करत नाहीये. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Diesel Price Rise Nirmala Sitharaman bjp government modi