esakal | ‘नार्कोटिक जिहाद’ची केंद्राकडून चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

बिशप कल्लारंगट्टू

‘नार्कोटिक जिहाद’ची केंद्राकडून चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतपुरम : अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीच्या आडून केरळमधील ख्रिश्‍चन नागरिकांचे धर्मांतर आणि इस्लामीकरण सुरू असल्याचा आरोप केरळमधील कॅथॉलिक बिशप (मुख्य धर्मोपदेशक) मार जोसेफ कल्लारंगट्टू यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यासंबंधी केलेल्या तक्रारीची बिशपच्या विधानाचे परिणाम याची चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला.

हेही वाचा: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; नंदिनी अगरवाल देशात पहिली

या प्रकरणाची तक्रार कोल्लम येथील अनिल एम. नंबुद्री यांनी गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा आदेश देण्यात आला. बिशप कल्लारंगट्टू यांच्या पलाई येथील निवासस्थानाला भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संरक्षण पुरविले आहे. त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बिशपच्या घरावर मोर्चा काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या दावा करण्यात आला. ‘एसडीपीआय’ या इस्लामिक गटाने ‘माकप’च्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांचे आज कोझिकोडमध्ये आगम झाले. ख्रिश्‍चन समाजातील काही बिशपबरोबर ते चर्चा करणार आहेत. बिशप कल्लारंगट्टू यांच्या खळबळजनक विधानानंतर ‘माकप’ने इस्लामिक गटाला समर्थन दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील ‘नार्कोटिक जिहाद’बद्दल माहिती नसल्याचे सांगितले.

हेही वाचा: 'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

बिशप कल्लारंगट्टू यांची वक्तव्ये...

  • जिहादी केवळ ‘लव्ह जिहाद’चाच नाही तर ‘नार्कोटिक जिहाद’चाही प्रसार करीत आहेत

  • प्रेमात पाडून अथवा अन्य एखाद्या मार्गाने दुसऱ्या धर्माच्या महिलांचा जिहादींकडून दहशतवाद किंवा आर्थिक फायद्यासाठी वापर केला जातो

  • ‘लव्ह जिहाद’ असे काही नसते हे सिद्ध करण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, ते वास्तव परिस्थितीपासून दूर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत

  • याला प्रेमविवाहाच्या रूपात न पाहता, ही युद्धाची एक रणनीती आहे

  • जिहादींचा एकच हेतू आहे, तो म्हणजे त्यांच्या धर्माचा विस्तार आणि मुस्लिमेतर सर्वांना नष्ट करणे. यासाठी ते ‘लव्ह जिहाद’ आणि नार्कोटिक जिहाद’चा वापर करीत आहेत.

loading image
go to top