Medical Student : युक्रेनसह या देशातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा

युक्रेनमधून सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी परतले आहेत.
Russia Ukraine War
Russia Ukraine War Sakal

Ukraine Returned Medical Students : रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान मायदेशी परतलेल्या 20,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अर्थात NMC ने या विद्यार्थ्यांना FMGE परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. यासाठी एक अट टाकण्यात आली आहे. .

परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी नॅशनल मेडिकल कमिशनने नियमांचा हवाला देत आपले करिअर पणाला लावून परत आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. मात्र, सरकारच्या आजच्या निर्णयामुळे रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतात परतलेल्या अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहे.

Russia Ukraine War
Mumbai: मुंबई एअरपोर्ट जवळच्या 48 इमारती होणार जमीनदोस्त, हायकोर्टाने दिला दणका

या विद्यार्थांनादेखील मिळणार दिलासा

दरम्यान, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसोबतच सरकारने कोविडमुळे चीन किंवा इतर देशांमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थांनादेखील ही परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) 23 जून रोजी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट (FMG) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अशा परदेशी वैद्यकीय पदवीधरांना एक वर्षाएवजी दोन वर्षांसाठी अनिवार्य रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप (CRMI) करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com