सरकारचे मोठे पाऊल; घुसखोरी रोखण्यासाठी इंडो-पाक बॉर्डरवर उभारणार...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

सध्या जुन्या कुंपणावरील बराचसा भाग बदलण्यात आला आहे. आता इथून पुढे सीमारेषांवर अँटी-कट कुंपणच बसविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारत सरकार आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवरील जुन्या कुंपणांच्या जागी अँटी-कट (कापता न येणारे) कुंपण बसवण्याच्या तयारीत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर भारत-बांगलादेश सीमेवरील लाठितीरा येथील 7.18 किमीचे कुंपण बदलण्यात आले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

7.18 कि.मी.च्या सीमावर्ती भागावर बसवण्यात येणाऱ्या कुंपणासाठी जवळपास 14 कोटी 30 लाख 44 हजार रुपयांचा खर्च आला असून सरासरी एक किलोमीटरपर्यंत अँटी-कट कुंपण उभारण्याची किंमत सुमारे 1.99 कोटी रुपये असल्याचे या अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. 

- JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

याबाबत माहिती देताना बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की, 'सरकार आता जुन्या कुंपणाच्या जागी नवीन अँटी-कट कुंपण बसवण्याची प्रक्रिया राबवत आहे. जी आधीच्या कुंपणाच्या ऐवजी अधिक प्रभावी असणार आहे. सध्या जुन्या कुंपणावरील बराचसा भाग बदलण्यात आला आहे. आता इथून पुढे सीमारेषांवर अँटी-कट कुंपणच बसविण्यात येणार आहे.'

- काश्मीरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले; आठवडाभरात फेरविचार करा!

तसेच सध्या बदलण्यात आलेले कुंपण हे फारच जुणे आणि कुमकुवत झालेले होते. त्यामुळे या ठिकाणावरून घुसखोर घुसण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी अतिरिक्त कुमक ठेवावी लागते. मात्र, नविन बसवलेले कुंपण घुसखोरी रोखण्यास उपयुक्त असल्याने घुसखोरीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

- गौरी लंकेशच्या मारेकऱ्याला झारखंडमध्ये अटक; आरोपी मूळचा औरंगाबादचा

नव्याने उभारण्यात येणारे कुंपण :- 

भारत-पाकिस्तान सीमा - 3323 किमी 
भारत-बांगलादेश सीमा - 4156 किमी 

कुंपण उभारण्यास लागणारा खर्च (1.99 करोड रुपये प्रति किलो मीटर) 
भारत-पाकिस्तान सीमा - 6 हजार 612 करोड रुपये 
भारत-पाकिस्तान सीमा - 8 हजार 270 करोड रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government is in process of effective anti cut fencing at border including Indo Pak border