राहुल हे "बनावट गांधी'; पाहा कोणी केली टीका

टीम ई सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्‍तव्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय हे खरे गांधी नसून हे "बनावट गांधी' कुटुंबीय असल्याचे विधान केले. हुबळी येथे पत्रकार परिषदेत जोशी यांनी ही टीका केली.

बंगळूर : राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्‍तव्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय हे खरे गांधी नसून हे "बनावट गांधी' कुटुंबीय असल्याचे विधान केले. हुबळी येथे पत्रकार परिषदेत जोशी यांनी ही टीका केली. रेप इन इंडियावर माफी मागणार नाही, हे सांगताना राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख केल्यामुळं सध्या ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले प्रल्हाद जोशी? 
हुबळीतील पत्रकार परिषदेत जोशी म्हणाले, 'राहुल गांधी म्हणाले आहेत, की ते राहुल सावरकर नाहीत. मात्र, तुम्ही सावरकर होणे अशक्‍य आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आपले वक्तव्य बदलता आणि आपले विचार जुळवून घेता. काही काळापूर्वी तुम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पण, सध्या तुम्ही शिवसेनेच्या सोबत सरकार बनविले आहे. त्यावरून तुमच्या विचारांशी तुम्ही कशाप्रकरे तडजोड करता, हे स्पष्ट झाले आहे.'

आणखी बातमी वाचा - 'चमट्टा बिरयानी वही बेचेगा' कोम आहे चमट्टा?

देवेंद्र फडणवीसांचीही टीका!
राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख केल्यामुळं त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटले आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत आम्ही चहापान करणार नाही, असा पवित्रा फडणवीस यांनी घेतला आहे.

Video : घोटाळे असतील तर कामे थांबवायची नाही का? : मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central minister pralhad joshi statement about congress leader rahul gandhi