esakal | पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार; नितीन गडकरींनी दिला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

gadkari

भारत देश शांतता आणि अहिंसेचा पाईक आहे. त्यामुळे आम्हाला विस्तारवादी बनायचे नाही असे म्हणत नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार; नितीन गडकरींनी दिला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद, ता. 15 (पीटीआय) ः भारत - पाक सीमेवर सातत्यानं पाककडून आगळीक सुरू असते. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानकडून हल्ले होत असतात. याच पार्श्वभूमीवर आता भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार असा इशारा दिला आहे. देशातील सहापैकी तीन नद्यांचे भारताच्या वाट्याचे पाकिस्तानला जाणारे पाणी अडविण्याची योजना आखली असून, लवकरचे ते थांबविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. हे पाणी जम्मू-काश्‍मीर, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशला देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर

गुजरातमधील जनसंवाद रॅलीमध्ये त्यांनी "व्हर्च्युअय'च्या माध्यमातून नागपूरमधून संवाद साधला. भारत देश शांतता आणि अहिंसेचा पाईक आहे. त्यामुळे आम्हाला विस्तारवादी बनायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "अखंड भारत असताना सहापैकी तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला येत होते. इतर तीन नद्यांचे पाणी भारत वापरणार होता. मात्र त्या नद्यांचे पाणी सध्या पाकिस्तानला जात आहे.'

संरक्षणमंत्री म्हणाले; दोन्ही देशांतील 'रोटी-बेटी'चं नातं कोणीही तोडू शकणार नाही

नितीन गडकरी म्हणाले की,'यापूर्वी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश राज्ये या मुद्यावर एकत्र येत नव्हती. आता जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या करारावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेला गती येणार आहे. भारताच्या वाट्याचे पाकिस्तानला जाणारे पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे पाणी जम्मू-काश्‍मीर, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशला देण्यात येईल.' 

कोविड-19 : शहांनी घेतली सर्वपक्षीय बैठक, जाणून घ्या नेमकं काय ठरलं

भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारं हे पाणी अडवण्याबाबत 1970 पासून कोणताही निर्णय झालेला नव्हता. मात्र मोदी सरकारने हा निर्णय घेण्याचे धैर्य दाखविले आहे, असे सांगत नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाही केली.