Madhya Pradesh Investment: चंबळ एक्सप्रेस-वेलगत उभारणार औद्योगिक पट्टे; बायोमासपासून फार्मा उद्योगांनाही चालना

Chambal Expressway Industrial Corridors, Madhya Pradesh Investment : मध्य प्रदेशात चंबळ एक्सप्रेस-वेलगत औद्योगिक पट्टे आणि लॉजिस्टिक क्लस्टर्स विकसित करण्याचे नियोजन आहे.
Madhya Pradesh Plans New Industrial Corridors Along the Chambal Expressway to Attract Investment and Create Jobs

Madhya Pradesh Plans New Industrial Corridors Along the Chambal Expressway to Attract Investment and Create Jobs

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळीपूर्वी चंबळ विभागीय औद्योगिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मुरैना येथे ‘जनविश्वास मोहिमे’अंतर्गत आयोजित उद्योजक संवाद कार्यक्रमात ही घोषणा केली. चंबळ एक्सप्रेस-वेलगत नवीन औद्योगिक क्षेत्रे आणि लॉजिस्टिक क्लस्टर्स विकसित करण्यावरही या वेळी भर देण्यात आला.

या संवादात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांनी सुमारे २० प्रमुख उद्योजकांशी चर्चा केली. औद्योगिक गुंतवणूक वाढवणे, निर्यातीला चालना देणे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे या बैठकीचे प्रमुख उद्देश होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com