Jharkhand CM Oath: झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; 10 दिवसांत सिद्ध करावे लागणार बहुमत

झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 10 दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
Jharkhand CM Oath
Jharkhand CM OathEsakal

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाच्या नेत्या चंपाई सोरेन यांनी आज (शुक्रवारी) झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. चंपाई सोरेन यांची गुरुवारी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

तत्पूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. यानंतर चंपाई म्हणाले की गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी (रुपी सोरेन) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.

Jharkhand CM Oath
400 कलमं, मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षे... समान नागरी संहितेचा मसुदा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर समीकरणे बदलली

JMM विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना विनंती केली होती की, त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा दावा मान्य करावा कारण राज्यात 'गोंधळ'ची परिस्थिती आहे. बुधवारी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्री नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे राजकीय संकट अधिक गडद झाले होते.

Jharkhand CM Oath
Jammu & Kashmir : काश्‍मीरमध्ये अखेर हिम‘चैतन्य’वर्षाव; पर्यटकांनी गजबजली पर्यटनस्थळे, स्थानिकांना दिलासा

प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनी सांगितले की, चंपाई सोरेन यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. काँग्रेस हा राज्यातील जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीचा मित्रपक्ष आहे. यापूर्वी चंपाई सोरेन यांनी आम्ही एकजूट असल्याचे म्हटले होते. आमची युती मजबूत आहे, ती कोणीही तोडू शकत नाही.

दरम्यान, भाजपने या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव म्हणाले की, दोन दिवसांपासून झारखंडच्या सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल आणि केंद्रीय नेत्यांविरोधात असभ्य भाषा वापरली आहे. काल पहिले पत्र दिले तेव्हा त्यातही तांत्रिक चुका होत्या.

Jharkhand CM Oath
Drunk And Drive: मद्यधुंद कारचालकानं महिलेला चिरडलं अन् स्कुटर 1 किमीपर्यंत नेली फरफटत! व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com