चंदा कोचर यांच्या मालमत्तेवर टाच

पीटीआय
शनिवार, 11 जानेवारी 2020

आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कर्ज गैरव्यवहार आणि कर चुकवेगिरीप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - आयसीआयसी-आय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि इतरांची ७८ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कर्ज गैरव्यवहार आणि कर चुकवेगिरीप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चंदा कोचर यांचे मुंबईतील घर आणि त्यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या काही मालमत्तांवर ‘ईडी’ने करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ‘ईडी’ने टाच आणली आहे. ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य ७८ कोटी रुपये आहे.

व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’कडून चंदा कोचर आणि इतर काही जणांची चौकशी सुरू आहे. बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉनला कर्ज देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.

JNU Attack: पोलिसांनी डाव्यांवरच ठेवला ठपका; आईशी घोषसह नऊ जणांची नावे जाहीर

‘ईडी’ या आठवड्यात या प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची चौकशी करीत आहे. चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बॅंकेतील कार्यकाळात व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सक्त वसुली संचालनालय करीत आहे. रिझर्व्ह बॅंक, ‘सीबीआय’ आणि ‘सेबी’ही या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ‘सेबी’ने या प्रकरणी आयसीआयसीआय बॅंक आणि चंदा कोचर यांना कारणे दाखवा नोटिसा बचावल्या आहेत. 

काय आहेत आरोप?
चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा फायदा करून दिल्याचा आरोप आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन समूहाला कर्ज उपलब्ध करून देत त्यांनी फायदा मिळवल्याचा आरोप आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ च्या कलम २०६ (५) अंतर्गत या प्रकरणी सहा कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. यामध्येच न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीचाही समावेश आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने न्यूपॉवर रिन्यूएबल्समध्ये भांडवल टाकले होते. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीची आहे. बॅंकेने व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत कोचर कुटुंबीयांचा सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chanda kochhar property seized