Chandigarh MMS Leak Case: व्हिडीओ लीक प्रकरणी आणखी एक जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandigarh University MMS Case

Chandigarh MMS Leak Case: व्हिडीओ लीक प्रकरणी आणखी एक जण ताब्यात

चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीक प्रकरणी रविवारी रात्री आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शिमला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय व्यक्तीला पंजाब पोलिसांनी धल्ली पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान यापूर्वी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणीच्या कथित प्रियकराला शिमल्यातूनच ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्या मुलीला देखील आधीच अटक करण्यात आली आहे. मात्र रविवारी रात्रीही चंदीदड विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. यादरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते मागे हटले नाहीत. विद्यापीठात मोठ्या संख्येने विद्यार्थी धरणे धरून बसले आहेत. दरम्यान या प्रकरणात अजूनही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.

हेही वाचा: Chandigarh University Case: आरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

शिमल्यातून सनी मेहता, जो आरोपी मुलीचा प्रियकर असल्याचे सांगितले जात होते, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यालाही पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिमला पोलिसांनी सांगितले की, महिलांविरोधातील प्रकरणांमध्ये शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जात आहे. त्याचवेळी चंदीगड विद्यापीठाचे विद्यार्थी रविवारी रात्रीही धरणे धरले होते. या सर्वांनी विद्यापीठ प्रशासनाकडे या प्रकरणी निवेदन जारी करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: भारतात लॉंच झाले १० तास बॅटरी लाइफ देणारे इअरबड्स; किंमतही बजेटमध्ये

Web Title: Chandigarh University Mms Leak Case Another Accused Held From Shimla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..