Chandra Grahan Live Streaming : फोनवर दिसणार चंद्रग्रहण, येथे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandra Grahan 2022

Chandra Grahan Live Streaming : फोनवर दिसणार चंद्रग्रहण, येथे पाहता येणार लाईव्ह स्ट्रिमिंग

Chandra Grahan Live Streaming : आज वर्षातील दूसरे आणि शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण पार पडणार आहे. त्यानंतर 2025 मध्ये खंडग्रास चंद्रग्रहणाचे दिसणार आहे. भारतातील चंद्रग्रहण संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत दिसणार आहे.

lunar eclipse

lunar eclipse

हेही वाचा: कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

भारतातील काही भागात चंद्रग्रहण सहज पाहता येणार आहे तर, काही भागात अंशतः ग्रहण दिसणार आहे. आज आम्ही ज्या भागात चंद्रग्रहण दिसणार नाहीये अशा व्यकींना ते त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. अशा काही वेबसाईट आहेत ज्या वर्षातील शेवटच्या ग्रहणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते जाणून घ्या.

Chandra Grahan

Chandra Grahan

हेही वाचा: Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ? हे वाचाच...

TimeandDate.com

या वेबसाइटवर तुम्ही चंद्रग्रहणाचे थेट प्रसारण पाहू शकता. या वेबकास्टमध्ये तुम्हाला चंद्रग्रहणाचा बहुतांश भाग पाहता येणार आहे. वेबसाइटशिवाय तुम्ही TimeandDate.com च्या YouTube चॅनेलवरदेखील चंद्रग्रहण थेट पाहू शकाल.

Lowell Observatory

Lowell Observatory च्या YouTube पेजवर तुम्ही चंद्रग्रहण थेट पाहू शकाल. या लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान कॉमेंट्री केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला चंद्रग्रहणाशी संबंधित अनेक रंजक मुद्देदेखील जाणून घेता येतील.

हेही वाचा: Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहण संपताच करा हे उपाय, अन्यथा...

Virtual Telescope Project

वरील दोन वेबसाईटशिवाय तुम्ही Virtual Telescope Project वर देखील चंद्रग्रहणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात. यासाठी तुम्हला Virtual Telescope Project च्या YouTube चॅनेलवर जावे लागेल. याशिवाय इतरही अनेक वेबसाइट्स आहेत ज्यावर चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. Virtual Telescope Project शिवाय तुम्ही Griffith Observatory च्या YouTube पेजवरही चंद्रग्रहण थेट पाहू शकता.

कधी होते खंडग्रास चंद्रग्रहण?

जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते. पृथ्वी दोघांच्या मध्ये आल्याने तिची सावली चंद्रावर पडते यामुळे आपल्याला ग्रहण दिसते. संपूर्ण चंद्रग्रहण दरम्यान, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे सर्व एकाच रेषेत असतात. आजनंतर 2025 मध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे.

टॅग्स :Lunar Eclipse