Chandra Shekhar Pemmasani: मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्र्याकडे 5700 कोटींची संपत्ती

Modi Cabinet 3.0: चंद्रशेखर यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली असली तरी त्यांना राजकारणात पूर्वीपासूनच रस होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते 2019 मध्ये टीडीपीमध्ये सहभागी झाले होते.
Chandra Shekhar Pemmasani TDP Richest Minister In Modi Cabinet
Chandra Shekhar Pemmasani TDP Richest Minister In Modi CabinetEsakal

नरेंद्र मोदी यांच्या यंदाच्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्ष एनडीएमध्ये सहयोगी आहे आणि भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, तर टीडीपीला 16 जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत टीडीपी कोट्यातील दोन खासदार राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांनी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राम मोहन हे देशातील सर्वात तरुण मंत्री झाले आहेत, तर चंद्रशेखर हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्री असतील. त्यांची संपत्ती 5700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

चंद्रशेखर पेम्मासानी यांनी गुंटूर लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पेम्मासानी यांनी आधीच आमदार असलेल्या व्यंकट रोसय्या किलारी यांचा पराभव केला. ते 3.5 लाख मतांनी पराभूत झाले.

चंद्रशेखर यांना 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली तर व्यंकट रोसैया यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली.

Chandra Shekhar Pemmasani TDP Richest Minister In Modi Cabinet
NDA Government: नवे सरकार मारणार चौकार? पाच वर्षांत NDA घेऊ शकते 'हे' चार मोठे निर्णय

गुंटूर लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान झाले. या टप्प्यात चंद्रशेखर हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते.

आता ते देशातील सर्वात श्रीमंत मंंत्री झाले आहेत. त्यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5,705 कोटी रुपये आहे. त्यांनी स्वतःला राजकारणी, डॉक्टर, उद्योगपती आणि समाजसेवक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी मोदी सरकार 3.0 मध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली.

Chandra Shekhar Pemmasani TDP Richest Minister In Modi Cabinet
PM Swearing In Ceremony: नरेंद्र मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

चंद्रशेखर यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली असली तरी त्यांना राजकारणात पूर्वीपासूनच रस होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते 2019 मध्ये टीडीपीमध्ये सहभागी झाले. त्यांचा जन्म 7 मार्च 1976 रोजी गुंटूरच्या बुरीपलेम येथे झाला.

लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर व्हायचे होते, त्यामुळे संधी मिळताच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात झोकून दिले. 1999 मध्ये त्यांनी एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर एमडी करण्यासाठी ते अमेरिकेत गेले.

2005 मध्ये, त्यांनी पेनसिल्व्हेनियामधील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून एमडी (इंटर्नल मेडिसिन) पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात काही वर्षे अध्यापनही केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com