esakal | 'चारधाम'साठी मार्गदर्शक सूचना जाहीर; सामान्यांना 'नो एन्ट्री'

बोलून बातमी शोधा

Chardham Yatra

२०१३ मधील केदारनाथ दुर्घटनेनंतर चारधाम यात्रेला सर्वाधिक फटका बसला होता.

'चारधाम'साठी मार्गदर्शक सूचना जाहीर; सामान्यांना 'नो एन्ट्री'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

डेहराडून : उत्तराखंडमध्ये कोरोना संक्रमण वाढू लागल्याने राज्य सरकारने चारधाम यात्रेबाबत (Chardham Yatra) महत्वाचा निर्णय घेतला आहे. १४ मे पासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी तेथील सरकारने मार्गदर्शक सूचना (SOP) प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार चारधाम यात्रेमध्ये सामान्य नागरिकांना सहभागी होता येणार नाही. मंदिर परिसरात प्रसाद वाटपास परवानगी नाही, तसेच टिळा-गंध लावता येणार नाही. मंदिर समितीमधील लोकांनाच मंदिरात प्रवेश मिळेल. पण त्यांना मूर्ती, घंटा आणि धार्मिक ग्रंथांना स्पर्श करण्यास परवानगी दिली जाणार नाही. (Chardham yatra 2021 govt released sop for door opening ceremony)

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये दारुचे दर वाढले; UP सरकारचा मोठा निर्णय

सामान्य नागरिकांना चारधाम यात्रेमध्ये सहभागी होता येईल का याबाबत बोलताना सरकारने म्हटले आहे की, भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, पण सध्या कोणालाही परवानगी नाही.

एसओपीनुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्ये फक्त रावल, पुजारी आणि मंदिराशी संबंधित स्थानिक हकूक धारी, पंडा पुरोहित, कर्मचारी आणि अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. पण यासाठी सर्वांना कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे. उत्तराखंडमधील चारधामपैकी यमुनोत्रीचे दरवाजे १४ मे रोजी उघडण्यात येतील. तसेच गंगोत्रीचे १५ मे, केदारनाथ मंदिराचे १७ मे आणि बद्रीनाथचे दरवाजे १८ मे रोजी उघडले जाणार आहेत.

हेही वाचा: बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय

चारधाम यात्रा

२०१३ मधील केदारनाथ दुर्घटनेनंतर चारधाम यात्रेला सर्वाधिक फटका बसला होता. गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध होते आणि यावर्षी पुन्हा एकदा चारधाम यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. २०१९ या वर्षी सुमारे ३२ लाख यात्रेकरुंनी चारधाम यात्रा केली होती.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.