चारधाम यात्रेत मृत्यूची साखळी; आठवडाभरात २३ यात्रेकरूंचा मृत्यू

23 pilgrims killed in a week at Chardham Yatra
23 pilgrims killed in a week at Chardham Yatra23 pilgrims killed in a week at Chardham Yatra

चारधाम यात्रा (Chardham Yatra) मार्गावर यात्रेकरूंच्या मृत्यूची साखळी सुरूच आहे. आठवडाभरात २३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने चारधामला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ॲडव्हायझरी, अलर्ट जारी केला आहे. असे असतानाही यात्रेकरूंचा मृत्यू होत आहे. यात्रा मार्गावरील रुग्णालयात आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, हे विशेष... (23 pilgrims killed in a week at Chardham Yatra)

चारधाम यात्रेच्या (Chardham Yatra) पहिल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कोरोना आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून (सीएमओ) अहवाल मागवला आहे. या मार्गावर प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य महासंचालक डॉ. शैलजा भट्ट यांनी सांगितले.

23 pilgrims killed in a week at Chardham Yatra
‘विरोधी पक्षात कसे राहायचे हेच काँग्रेसला कळत नाही; सत्तेत राहण्याची सवय’

चारधाम (Chardham Yatra) आणि यात्रा मार्गावर एकूण १३२ डॉक्टर (doctor) तैनात केले आहेत. तर १०२ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात्रा मार्गावर आठ रक्तपेढ्या, चार रक्त साठवण युनिट सुरू करण्यात आले आहेत. या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. शैलजा भट्ट यांनी सांगितले.

एसडीआरएफ आणि आरोग्य विभागाच्या (Department of Health) पथकांना आपापसात समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवासादरम्यान नागरिकांना आरोग्य सुविधांची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आरोग्य सचिव राधिका झा यांनी बुधवारी आरोग्य सेवांचा आढावा घेताना सांगितले.

23 pilgrims killed in a week at Chardham Yatra
ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदाराचा दावा

आरोग्य विभागाची मार्गदर्शक सूचना

  • आरोग्य तपासणीनंतरच प्रवासाला निघा.

  • जे लोक आधीच आजारी आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला फॉर्म, डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे सोबत ठेवावी.

  • देवळापर्यंत पोहोचण्यापूर्वी वाटेत एक दिवस विश्रांती घ्या.

  • उबदार आणि लोकरीचे कपडे सोबत ठेवा.

  • हृदयरोगी, श्वासोच्छ्वासाचे रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी उंचावरील भागात विशेष काळजी घ्यावी.

  • डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता, हृदयाचे ठोके जलद होणे, उलट्या होणे, हात-पाय व ओठ निळे पडणे, थकवा येणे, धाप लागणे, खोकला किंवा इतर लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जा आणि १०४ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

  • धूम्रपान आणि इतर मादक पदार्थांचा वापर टाळा.

  • कडक सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरा.

  • डोळ्यांना अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्यासाठी सनग्लासेस वापरा.

  • प्रवासादरम्यान पाणी प्यायला ठेवा आणि उपाशी राहू नका.

  • जास्त उंचीच्या भागात व्यायाम करणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com