
‘विरोधी पक्षात कसे राहायचे हेच काँग्रेसला कळत नाही; सत्तेत राहण्याची सवय’
प्रदीर्घ काळ सत्तेत असूनही काँग्रेसला (Congress) विरोधी पक्षात कसे राहायचे हेच कळत नाही. काँग्रेसच्या लोकांमध्ये समस्या असल्याचे मला दिसते. त्यांना असे वाटते की जेव्हा लोक संतप्त होतील तेव्हा ते सरकार पाडतील आणि मग आम्ही सत्तेत येऊ. ते म्हणतात तुम्हाला काय माहीत? आम्हाला सर्व काही माहीत आहे. आम्ही बऱ्याच दिवसांपासून सरकारमध्ये आहोत, असे प्रशांत किशोर (prashant kishor) म्हणाले. (prashant kishor said, Congress does not know how to stay in the Opposition)
काँग्रेससोबत प्रदीर्घ चर्चा करूनही त्यांच्यासोबत न गेलेल्या प्रशांत किशोर यांनी आता त्यांच्याबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. अनेक दशकांपासून ते सत्तेत आहे. परंतु, विरोधात कसे राहायचे हे त्यांना शिकावे लागेल. मीडिया आपल्याला कव्हर करीत नाही या म्हणीतून सुटू शकत नाही. त्यांना सत्तेत राहण्याची सवय झाली आहे. आज लोक त्यांचे ऐकत नाहीत, असेही प्रशांत किशोर (prashant kishor) म्हणाले.
हेही वाचा: ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदाराचा दावा
सध्या एकही पक्ष भाजपला टक्कर देऊ शकत नाही. १९५० ते १९९० च्या दशकात काँग्रेसशी (Congress) स्पर्धा करू शकलेला एकही पक्ष आपण पाहत नाही. यात बराच वेळ गेला. भाजपला एकत्र आव्हान दिले नाही तर अजून बराच काळ जाऊ शकतो. कोणताही एक पक्ष भाजपचा पराभव करेल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
मोठा वर्ग सरकारच्या विरोधात
काँग्रेस १९८४ पासून सतत अधोगतीच्या टप्प्यात आहे. तेव्हापासून ते आपल्या पातळीवर एकदाही सरकार स्थापन करू शकलेले नाही. २००४ मध्ये १४५ जागांसह काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यात सातत्याने घसरण झाल्याचे आपण पाहू शकतो मुद्द्यांच्या आधारे एक मोठा वर्ग सरकारच्या विरोधात दिसतो. परंतु, त्याचा फायदा विरोधक घेऊ शकले नाही, असे प्रशांत किशोर (prashant kishor) म्हणाले.
हेही वाचा: विदर्भात कंडोमचा वापर वाढला; राष्ट्रीय सर्व्हेतून समोर आली बाब
...तर कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही
काँग्रेसची (Congress) सतत घसरण होत आहे. त्यांची व्होट बँक अद्याप सावरलेली नाही. शाहीन बाग आणि किसान आंदोलन यासारख्या निदर्शनांमध्ये एकही चेहरा नव्हता. परंतु, एका मुद्द्यामागे काही लोक एकत्र आले आणि आंदोलन करीत राहिले. मग सरकारला माघार घ्यावी लागली. यावरून हेच दिसून येते की, तुमच्याकडे कथन असेल तर कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
Web Title: Congress Does Not Know How To Stay In The Opposition Prashant Kishor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..