अंधश्रद्धेचा कळस! जखमींवर गाईच्या शेणाने उपचार केले आणि...

chattisgarh injured people buried in cow dung for cure
chattisgarh injured people buried in cow dung for cure

रायपुर - छत्तीसगढमधील जशपूर इथं वीज कोसळल्यानं एका महिलेसह तीन जण जबर जखमी झाले होते. तिघेही यामध्ये होरपळले होते. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी ग्रामस्थांनी उपचारासाठी गाईच्या शेणात ठेवलं. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र  त्यापैकी दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.  जशपूर जिल्ह्यात बागबहार गावात ही घटना घडली. सुनील साई (वय 22) आणि चंपा राऊत (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. अन्य तिसऱ्याचे वय 23 असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी घडली. जेव्हा तिघेही छत्तीसगडच्या आदिवासी बहुल जशपूर जिल्ह्यातील बागबहार गावात रविवारी सायंकाळी शेतात काम करत होते. त्याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक वादळी वारे आणि वीजाही कडाडू लागल्या. त्यावेळी तिघेही एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी अचानक वीज कोसळली आणि ते गंभीररीत्या जखमी झाले. वीज कोसळल्याने तिघेही गंभीर भाजले होते. त्यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची आवश्यकता होती. मात्र गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन न जाता शेणामध्ये पायापासून ते मानेपर्यंत गाडले.

गाईच्या शेणामुळे भाजलेल्या जखमा बऱ्या होतात अशी गावकऱ्यांची समजूत होती. 
वीज अंगावर पडलेल्या तिघांना गाईच्या शेणातच ठेवल्यानंतर गावातील काहींनी यावर आक्षेप घेतला. शेवटी गावकऱ्यांनी तिघांनाही स्थानिक रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांपैकी सुनील आणि चंपा यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारी नियमामुसार मृतांच्या नातेवाइकांना मदत केली जाईल असंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com