Gautam Adani, Narendra Modi
Gautam Adani, Narendra Modi

Chaukidar Hi Chor Hain: अदानी प्रकरणानंतर 'चौकीदार ही चोर है' पुन्हा ट्रेंडिंगमध्ये!

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी एंटरप्राइजेसवर आपला बहुचर्चित एफपीओ रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चनं जाहीर केलेल्या अहवालानंतर अदानी समूह चांगलाच अडचणीत आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर बुधवारी रात्री अदानी एंटरप्राइझेसवर आपल्या बहुचर्चित २०,००० कोटींची फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

अदानी समुहाच्या या निर्णयानंतर आज सकाळपासूनच 'चौकीदार चोर है' हा ट्रेन्ड पुन्हा एकदा सुरु झाला. (Chaukidar hi chor hain in trending again after Adani Enterprises scraps FPO)

Trending
Trending
Gautam Adani, Narendra Modi
ED Chargsheet: दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा पैसा आपनं गोव्याच्या निवडणुकीत वापरला; ईडीचा खळबळजनक दावा

अदानी समुहामध्ये सर्वकाही अलबेल नाही, असा दावा हिंडेनबर्ग रिसर्चनं नुकताच केला होता. या अहवालानं अदानी एंटरप्राइझेच्या कार्यपद्धतीबद्दल ८८ प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये अदानी समुहानं हवाला मार्गानं परदेशात पैसे पाठवले आणि परदेशी संस्थांच्या मार्फत पुन्हा स्वतःच्याच शेअरमध्ये गुंतवून शेअरचे भाव फुगवले असे अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Gautam Adani, Narendra Modi
Nashik MLC Election: नाशिकमध्ये सत्यजीत तांबेच निवडून येतील; अजित पवारांचा दावा

हिंडेनबर्ग रिसर्चचा हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात अदानींचे शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळं गौतम अदानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून दुसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर ढकलले गेले. पण काल एफईओ रद्द केल्यानंतर तर त्यांची घसरण थेट चौदाव्या स्थानी झाली.

हे ही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

यापूर्वीही झाला होता 'चौकीदार चोर है'चा ट्रेंड

यापूर्वीही सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'चौकीदार चोर है' हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर 'मै चौकीदार हूं' ही मोहिम चालवली होती. याला मोदी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आपले डीपी बदलले होते. पण त्यांच्या या मोहिमेला विरोध करताना तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कथित राफेल घोटाळ्याचा मुद्दा लावून धरत 'चौकीदार चोर है' ही मोहिम चालवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com