

Bijapur Maoist blast
ESakal
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातून पुन्हा एकदा नक्षलवादी हिंसाचाराची नोंद झाली आहे. माओवाद्यांनी जंगलात पेरलेले अनेक प्रेशर बॉम्ब फुटल्याने अकरा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. रविवारी (२५ जानेवारी) नक्षलविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांवरील घनदाट जंगलात घडली.