

Soldiers martyred Chhattisgarh
ESakal
छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरुंग निकामी करण्याच्या मोहिमेदरम्यान झालेल्या आयईडी स्फोटात तीन जवान शहीद झाले. या स्फोटात डीआरजीचे तीन जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना छोटेबेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात घडली.