What Did B.R. Gavai Say About Retirement? : भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी निवृत्तीनंतरच्या त्यांच्या प्लॅनबद्दल सांगितले आहे. निवृत्तीनंतर ते काय करणार आहेत याबाबतची माहिती सरन्यायधीशांनी स्वतः दिली आहे. याबद्दल माहिती देताना सरन्यायाधीश गवई म्हणाले की, मी निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही. न्यायमूर्ती गवई या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होतील. १४ मे २०२५ रोजी त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी शुक्रवारी सांगितले की, ते निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाहीत. ते महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते. या दरम्यान, सरन्यायाधीश गवई म्हणाले, "मी निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही असा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर मला अधिक वेळ मिळेल, म्हणून मी दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करेन."
तर यापूर्वी न्यायमूर्ती गवई यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात येण्यास नकार दिला होता. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, "सरन्यायाधीशपद भूषवल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कोणतीही जबाबदारी घेऊ नये. जर एखाद्या न्यायाधीशाने निवृत्तीनंतर सरकारी पद स्वीकारले किंवा निवडणूक लढवली तर तो चुकीचा संदेश जातो. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो."
तसेच, सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल ते म्हणाले होते की, "मी सोशल मीडिया फॉलो करत नाही, पण माझा असाही विश्वास आहे की न्यायाधीश घरी बसून निकाल देऊ शकत नाहीत. आपल्याला सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत."
दरम्यान नदिवशी गावात पोहोचल्यानंतर मोठ्या गर्दीने सरन्यायाधीशांचे स्वागत केले होते. त्यांनी त्यांचे वडील, केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आर.एस. गवई यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काही कुटुंबीयांसह उपस्थित राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.