Cabinet Expansion : मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Latest News

मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

Eknath Shinde Latest News नवी दिल्ली : दिल्लीत आयोजित बैठकीसाठी आलो आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत असते. दोन बैठकीत सहभाग घेणार आहे. दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

शिंदे गट व भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. आज या गोष्टीला जवळपास दीड महिना होणार आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

हेही वाचा: नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात

विस्तारावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला कशाची भीती नाही, तुमचे सरकार योग्य आहे तर का करीत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला होता. मात्र, लवकरच विस्तार होणार या शिवाय कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही.

उलट दिल्ली दौऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. दिल्लीतून परवानगी मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार नाही, असे विरोध म्हणत आहे. यामुळे शनिवारी (ता. ६) दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

विस्तारात कोणतीही अडचण नाही

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात कोणताही अडथळा किंवा अडचण नाही. लवकरच विस्तार केला जाईल. कोणतेही काम थांबलेले नाही. काम होत आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तारीख पे तारीख

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर फक्त तारीख मिळत आली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) विस्तार होईल अशी चर्चा असताना ७ ऑगस्टपर्यंत विस्तार केला जाईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले होते. मात्र, त्यांनी अधिकृत तारीख सांगितली नव्हती. यामुळे विस्तार कधी होईल, असाच प्रश्न राजकारण्यांपासून सामान्यांचा तोंडून निघत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार होईल, असे म्हणून वेळ मारून नेली. मात्र, अधिकृत तारीख काही सांगितली नाही.

Web Title: Chief Minister Eknath Shinde Cabinet Expansion Delhi Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..